उद्योग Go Back उद्योगांचे सामाजिक दायित्व views 2:37 उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणजे उद्योगांनी समाजाला काहीतरी देणे असे होय. या संकल्पनेचा समावेश कंपनी कायदा 2013 मध्ये केला गेला. या कायद्यानुसार ज्या उद्योगांचे निव्वळ मूल्य 500 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे, किंवा ज्यांची उलाढाल 1000 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा उद्योगांनी त्यांच्या नफ्याच्या किमान 2% रक्कम आर्थिक, सामाजिक किंवा पर्यावरणीय संतुलनासाठी किंवा विकासासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. टाटा उद्योग, रिलायन्स, इन्फोसिस, एल अँड टी, विप्रो यांसारख्या आपल्या देशातील उद्योग समूहांनी समाजासाठी अनेक उपक्रम व समाजहितासाठी अनेक कार्ये केली आहेत. म्हणजेच मुलांनो, उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजाच्या हितासाठी तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती म्हणजे उद्योगाचे सामाजिक दायित्व समजले जाते. आपल्या देशात गरिबी, शिक्षण, आरोग्य, पर्यावरणीय समस्या सोडविण्यासाठी शासनाबरोबर या समूहांनीही मदत करावी हा त्यामागील उद्देश आहे. 1)शैक्षणिक सोयी-सुविधा पुरविणे. 2)आरोग्यविषयक सुविधा पुरविणे 3)गाव अथवा विभागाचा विकास करणे. 4)निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे. मुलांनो, अशा प्रकारे उद्योगांनी सामाजिक दायित्व निभावण्याच्या कार्यासाठी केलेल्या खर्चावर उद्योग समूहांना सरकारकडून करामध्ये सवलत मिळते. त्यामुळेही अशा गोष्टींमध्ये सहकार्य करण्यास उद्योग समूह नेहमी तयार असतात. मानव संसाधन व उद्योग यांची सांगड घालावयाची झाली तर ती पुढीलप्रमाणे असेल: मानव संसाधनाचे प्रमाण पुरेसे असेल आणि ते मनुष्यबळ उच्च दर्जाचे असेल, तर उद्योगांचा विकास जलद गतीने होतो. तर मानव संसाधनाचा तुटवडा किंवा कमतरता असेल, तसेच मानव संसाधनाचा दर्जा निम्न असेल, म्हणजे मनुष्यबळ कुशल नसेल तर उद्योगांचा विकास संथ गतीने होतो. प्रस्तावना उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक पहा बरे जमते का? जरा डोके चालवा जरा डोके चालवा औद्योगिक विकास सांगा पाहू! उद्योगांचे सामाजिक दायित्व औद्योगीकरण व पर्यावरण पहा बरे जमते का? जलसाक्षरता-काळाची गरज