उद्योग Go Back जलसाक्षरता-काळाची गरज views 5:35 पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. आपल्याला पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी पाण्याची खूप गरज असते. अलिकडील काळात वाढणारी लोकसंख्या, बदलणारे निसर्गचक्र, अनियमित पडणारा पाउस या सर्व कारणांमुळे गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. आपल्या देशातही येणाऱ्या काही वर्षांमध्ये पाण्याच्या तीव्र टंचाईची समस्या जाणवणार आहे हे भारतातील जल उद्योगांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांनो, आज जरी आपल्याला मुबलक पाणी दिसत असले तरी येणाऱ्या काळात हे चित्र बदलणार आहे. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीची मुबलकता असलेला देश आहे. पावसाळ्यात पाऊस पडल्यामुळे भारतीय नद्यांना भरपूर पाणी असते. परंतु मुलांनो, असे असूनही भारतातील काही भागांत दुष्काळ का बरे पडत असेल? तर नद्यांतील पाणी आपण अडवत नाही. त्यामुळे हे गोडे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे गोड्या पाण्याचे खाऱ्या पाण्यात रूपांतर होऊन ते मानवी वापरास योग्य राहत नाही. म्हणूनच नद्यांचे पाणी बांध, बंधारे, धरण बांधून अडविणे खूप गरजेचे आहे. प्रस्तावना उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक पहा बरे जमते का? जरा डोके चालवा जरा डोके चालवा औद्योगिक विकास सांगा पाहू! उद्योगांचे सामाजिक दायित्व औद्योगीकरण व पर्यावरण पहा बरे जमते का? जलसाक्षरता-काळाची गरज