पूर्णांक संख्या Go Back उदाहरणांच्या मदतीने नियम समजून घेऊ views 2:12 आता आपण काही उदाहरणांच्या मदतीने पूर्णांक संख्या चिन्हांचे नियम समजून घेऊ. प्रथम समान चिन्ह पूर्णांकांची बेरीज करू. आता भिन्न चिन्ह पूर्णांकांची बेरीज करू. 3 + (2) = 5 -5 + 7 = +2 1+ (5) = 6 -3 + 6 = +3 -3 + (-4) = -7 -5 +3 = -2 -4 + (-2) = -6 -3 +4 = +1 या सर्व बेरजांचे जर आपण निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की . 1) डावीकडील बेरजा ह्या समान चिन्ह असलेल्या पूर्णांकांच्या आहेत. त्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार न करता बेरीज केली आहे. आणि येणाऱ्या बेरजेला म्हणजेच उत्तराला दोघांचे समान चिन्ह दिले आहे. जसे -3 + (-4) = -7. यामध्ये दोघांचेही चिन्ह – (ऋण) आहे. म्हणून मिळालेली बेरीजही ऋण आहे. 2) उजवीकडील बेरजा ह्या भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांकांच्या आहेत. त्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार न करता – मोठया संख्येतून लहान संख्या वजा केली आहे. आणि आलेल्या वजाबाकीला मोठया संख्येचे चिन्ह दिले आहे. जसे +3 -5 = -2. यामध्ये दोघांचे चिन्ह भिन्न आहे. म्हणून मिळणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह दिले आहे. प्रस्तावना पूर्णांक संख्या पूर्णांक संख्यांची बेरीज एखाद्या संख्येत ऋण संख्या मिळवणे उदाहरणांच्या मदतीने नियम समजून घेऊ विरुद्ध संख्या व त्यांचे गुणधर्म पूर्णांक संख्यांचा लहानमोठेपणा पूर्णांक संख्यांची वजाबाकी