अपूर्णांक

समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक

views

2:15
समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक १) आता आपण खाली दिलेल्या उदाहरणांचा अभ्यास करू व समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांकांची संकल्पना स्पष्ट करून घेऊ. उदा. 4/3, 5/8, 11/3, 6/9, 7/8, 3/2, 11/5 या दिलेल्या अपूर्णांका मध्ये आपल्याला कोणती गोष्ट समान वाटते? वि: यांपैकी काही अपूर्णांकांचे छेद समान असल्याचे दिसून येते. तर काही अपूर्णांकांचे छेद वेगळे दिसून येतात. अगदी बरोबर. तर ज्या अपूर्णांकाचे छेद सारखे किंवा समान असतात. त्या अपुर्णांकाला समच्छेद अपूर्णांक म्हणतात. जसे वर दिलेल्या उदाहरणामध्ये 4/3 व 11/3 आणि 5/8 व 7/8 हे समच्छेद अपूर्णांक आहेत. आणि ज्या अपूर्णांकाचे छेद समान नसतात त्यांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. उदा. वरील उदाहरणातील 6/9, 3/2, 11/5