अपूर्णांक

अपूर्णांकांचा लहान – मोठेपणा

views

2:24
समान छेद असलेल्या अपूर्णांकांचा लहान – मोठेपणा : समच्छेद अपूर्णांकांची तुलना करताना किंवा त्यामधील लहान व मोठा अपूर्णांक ठरवताना अपूर्णांकांच्या अंशाचा विचार करावा लागतो. म्हणजेच समान छेद असलेल्या अपूर्णांकांमध्ये ज्या अपूर्णांकांचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो.आता आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा किंवा अपूर्णांकांची तुलना कशी करायची याचा अभ्यास करूया.उदा. 3/8 व 4/8 या अपूर्णांकांत पहिल्या अपूर्णांकाचा अंश 3 आहे व दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 4 आहे. साहजिकच 4 हे 3 पेक्षा मोठे आहेत. म्हणून 3/8 व 4/8 या अपूर्णांकात 4/8 हा अपूर्णांक मोठा आहे.