ब्रिटिश सत्तेचे परिणाम Go Back ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम:दुहेरी राज्यव्यवस्था views 04:18 ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम :- दुहेरी राज्यव्यवस्था :- मे १७६५ मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह दुसऱ्यांदा बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्याने ऑगस्ट १७६५ ला बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तिवात आणली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने आपल्या हाती घेतले. तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. याचाच अर्थ बंगालवर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. असे असले तरी इंग्रजांना त्यांच्या राज्यकारभाराची जवाबदारी आपल्या अंगावर घ्यायची नव्हती. कारण अशा प्रकारचा कारभार करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक तेवढे मनुष्यबळ नव्हते. बंगालवर इंग्रजांनी संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करून राज्यकारभार करण्यास सुरुवात केली असती तर मराठे व इतर हिंदी सत्तांनी एकदम संघर्ष सुरु केला असता व अशा संघर्षाला त्यांना तोंड देता आले नसते. दुहेरी राज्यव्यवस्थेचे वाईट परिणाम व त्याच्यातील दोष थोड्याच दिवसांनी दिसून येऊ लागले. राज्यात दुष्काळ पडला तरी कंपनी आपले वसुलीचे काम चोखपणे पार पाडून करोडो रूपयांची संपत्ती गोळा करीत असे. तसेच सामान्य जनतेकडून कररूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वत:कडे ठेवले. अनेक अधिकारी भ्रष्टाचार करू लागले. प्रस्तावना तैनाती फौजा छत्रपती प्रतापसिंह ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम:दुहेरी राज्यव्यवस्था मुलकी नोकरशाही इंग्रजांची आर्थिक धोरणे नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम: वाहतूक व दळणळण व्यवस्थेत सुधारणा सामाजिक व सांस्कृतिक परिणाम