अन्न पदार्थांची सुरक्षा

अन्नबिघाडास कारणीभूत घटक

views

4:28
आपण जे अन्न खातो ते खराब असता कामा नये. ते स्वच्छ आणि चांगले असायला हवे. हे खराब अन्न कसे असते हे समजण्यासाठी तुम्ही एक कृती करा. एक ब्रेडचा तुकडा घ्या. त्या ब्रेडवर थोडे पाणी टाका. पाणी टाकलेला हा ब्रेड हवाबंद डब्यामध्ये किमान 8 दिवस ठेवा. नंतर हा डबा 8 दिवसांनी उघडून पहा. तुम्हाला दिसेल की त्या डब्यातून अतिशय घाणेरडा असा वास येतो आहे. आणि त्या ब्रेडवर बुरशी जमा झाली आहे. म्हणजेच त्यावर काळे हिरवे असे काही पदार्थ जमा झाले आहेत. असा पदार्थ हा खराब झालेला पदार्थ असतो. असे पदार्थ खराब होतात कारण त्यातील पाण्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते. काही वेळा फळे तसेच फळांच्या साली काळपट पाडतात. काही पदार्थांना कडवट किंवा नकोसा वाटणारा घाणेरडा वास येतो. शेंगदाणे जुने झाले की ते खवट लागतात आणि त्यांचा वासही नकोसा वाटतो. पदार्थ हे निसर्गत: खराब नसतात. त्यांची योग्य साठवणूक केली नाही, त्यावरील प्रक्रिया योग्य रितीने केल्या नाहीत की हे पदार्थ बिघडतात.