अन्न पदार्थांची सुरक्षा

अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून घ्यायची काळजी

views

4:20
आपण अन्नाची संख्यात्मक आणि गुणात्मक नासाडी कशी होते ते पाहिले. तर अशा प्रकारची अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी आपण काही गोष्टी करणे गरजेचे आहे. जसे, आवश्यक असेल तेवढेच अन्न ताटात वाढून घेतले पाहिजे. स्वंयपाक आवश्यक असेल तेवढाच करावा. आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी केली पाहिजे. आपला अधिक खरेदीचा मोह टाळला पाहिजे. शिल्लक राहिलेले अन्न टाकून देऊ नये. तर त्याचा योग्य पद्धतीने पुन्हा वापर केला पाहिजे. ताटामध्ये घेतलेले सर्व अन्न संपवले पाहिजे. अन्नधान्य किंवा इतर पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक केली पाहिजे. उदाहरणार्थ फळे, भाज्या, दूध इत्यादी. हवाबंद डबे, बाटल्यांमधील पदार्थांची वापरण्याची अंतिम तारीख पाहून त्या तारखे पूर्वीच पदार्थ वापरले पाहिजेत. लग्न समारंभातील अक्षता म्हणून वापरल्या जाणाऱ्या तांदळाचा वापर टाळावा. त्याऐवजी फुले वापरावी. अशाप्रकारे आपण अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकतो.