अन्न पदार्थांची सुरक्षा

अन्नभेसळ कशी शोधाल?

views

4:5
आजकाल दूधामध्ये पाण्याची भेसळ असते. तर ही भेसळ ओळखण्यासाठी सर्वात आधी दूधाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून काचपट्टी तिरकी करून घ्या. त्यामुळे दूधाचा थेंब खाली ओघळेल. जर काचपट्टीवर ओघळण्याची पांढरी खूण दिसली नाही तर दुधात पाणी मिसळलेले आहे असे आपल्याला सहज दिसून येते. तसेच ह्या दुसऱ्या प्रयोगाद्वारे आपण दुधातील भेसळ ओळखू शकतो. यासाठी एका वाटीमध्ये थोडे दूध घ्या. या दुधाच्या वाटीमध्ये थोडे टिंक्चर आयोडिन टाका. मेडिकल मध्ये हे आयोडिन सहज उपलब्ध होते. आता हे मिश्रण हलवून घ्या. दूधाचा कलर बदलायला लागला आणि आता तो वांगी रंगासारखा झाला आहे. म्हणजेच यामध्ये भेसळ झाली आहे. दूधाचा कलर जर बदलला नसता. तो पांढराच राहिला असता तर त्यामध्ये भेसळ नाही असे सिद्ध झाले असते.