अन्न पदार्थांची सुरक्षा

अन्ननासाडी

views

4:18
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने आपल्या देशाने विविध प्रकारचे अन्नधान्य, फळे, भाज्या, मत्स्य उत्पादन तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनामध्ये प्रचंड आघाडी घेतली आहे. आपल्या देशामध्ये श्रीमंत, मध्यम आणि गरीब असे वर्ग आहेत. आपला भारत कृषिप्रधान देश आहे तरीही या देशातील अनेक लोक असे आहेत जे आजही अन्नाशिवाय झोपी जातात. त्यांना एका वेळचे जेवणही मिळत नाही. असे होते, कारण मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते आहे. ही अन्ननासाडी दोन प्रकारची आहे. संख्यात्मक अन्ननासाडी आणि गुणात्मक अन्न नासाडी.