अन्न पदार्थांची सुरक्षा

अन्नभेसळ

views

3:4
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काहीना काही तरी खातच असतो. उदा: फळे, भाज्या, दूध इत्यादी. आपण जे अन्न खातो ते सकस आणि शुद्ध असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. हेच अन्न जर भेसळयुक्त असेल तर आपल्या शरीराला ते हानिकारक असते. अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त, अतिरिक्त वा कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो. त्यालाच अन्नाची भेसळ म्हणतात. भाज्या, दूध, मसाल्याचे पदार्थ, कडधान्य अशा प्रत्येक पदार्थामध्ये भेसळ आढळते. भेसळयुक्त अन्नामुळे लहान-मोठे, गरीब- श्रीमंत सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे वेगवेगळे परिणाम होतात. काही भेसळीच्या पदार्थांमुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न दीर्घकाळ खाल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात. तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो.