द्रव्यांचे संघटन

मूलद्रव्यांचे प्रकार

views

2:44
आता आपण मूलद्रव्यांच्या प्रकारांविषयी जाणून घेणार आहोत. मूलद्रव्यांचे तीन प्रकार आहेत: "धातू, अधातू आणि धातुसदृश्. निसर्गामध्ये 92 मूलद्रव्ये आढळतात. तर 13 पेक्षा जास्त मूलद्रव्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम पद्धतींनी तयार केली आहेत. आता आपण मूलद्रव्यांचे प्रकार अधिक विस्ताराने बघणार आहोत. मूलद्रव्यांना चकाकी, निस्तेजपणा, वर्धनीयता, ठिसूळपणा असे भौतिक गुणधर्म आहेत व त्या गुणधर्मांच्या आधारे मूलद्रव्यांचे वर्गीकरण करता येते. सुरवातीला मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे ‘धातू’ व अधातू अशा दोन प्रकारांत केले जात होते. परंतु नंतरच्या काळात आणखी काही मूलद्रव्यांचा शोध लागला व ‘धातुसदृश’ हा प्रकार अस्तित्वात आला.