द्रव्यांचे संघटन

मिश्रणांचे प्रकार

views

5:13
एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था असे म्हणतात. जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्या मिश्रणाला ‘समांगी मिश्रण’ असे म्हणतात. जेव्हा मिश्रणातील घटक दोन किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागलेले असतात. तेव्हा त्या मिश्रणाला ‘विषमांगी मिश्रण’ असे म्हणतात. एका स्थायूचे एकत्रित असलेले किंवा एका पात्रात असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था तयार होते. उदा: वाळूचा ढीग. तर द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेले सर्व द्रावणाचे पदार्थ मिळून एकच प्रावस्था तयार होत असते. उदा: समुद्राचे पाणी. तसेच एका द्रवाची किंवा एका पात्रात असलेल्या द्रवाच्या सर्व थेंबाची मिळून एकच प्रावस्था होते. उदा: पावसाचे थेंब. तसेच एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकांत न मिसळलेल्या द्रव्यांच्या प्रावस्था स्वतंत्र असतात. उदा: तेल व पाणी. तसेच एकत्रित असलेल्या सर्व वायुरूप पदार्थांची मिळून एकच प्रावस्था असते. उदा: हवा. आता आपण आणखी एक प्रयोग करूया. सर्वप्रथम तीन चंचुपात्रे घ्या. त्यातील पहिल्या चंचुपात्रात 10 ग्रॅम मीठ घ्या. दुसऱ्या चंचुपात्रात लाकडाचा भुसा घ्या. तिसऱ्या चंचुपात्रात 10 मिली दूध घ्या. आता चंचुपात्रांत 100 मि.ली पाणी ओता आणि ढवळा. आता मला सांगा पाण्याची स्वतंत्र प्रावस्था तुम्हाला कोणत्या मिश्रणात दिसते? लाकडाचा भुसा व पाणी यांच्या मिश्रणात.