द्रव्यांचे संघटन

रेणुसूत्र व संयुजा

views

4:05
संयुगामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठरावीक असते. संयुगाच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूंची संख्या यांच्या साहाय्याने केलेले लेखन म्हणजे रेणुसूत्र होय. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे किती अणू असतात. हे रेणुसूत्राच्या साहाय्याने दाखविले जाते. संयुगांच्या रेणूंमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयुगातून एकत्र आलेले असतात. उदा. पाणी- H2O, म्हणजेच ‘H’ हायड्रोजनचे 2 अणू असतात तर ‘O’ ऑक्सिजनचा 1 अणू असतो. म्हणजेच रेणूसुत्रावर आपल्याला घटक मूलद्रव्यांची संपूर्ण कल्पना येते. रेणुसूत्र आणि रेणूमधील विविध मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या यातील संबंध कसा असतो ते: अणू हे एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात व अणुची दुसऱ्या अणुशी रासायनिक बंधाने जोडली जाण्याची क्षमता हाच प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म आहे. अणूची जोडले जाण्याची ही क्षमता एका संख्येने दाखविली जाते आणि याच संख्येला अणूची संयुजा असे म्हणतात. एक अणू हा त्याच्या संयुजे इतकाच रासायनिक बंध इतर अणूबरोबर तयार करत असतो. सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांची संयुजा त्याच्या विविध संयुगामध्ये स्थिर असल्याचे दिसून येते.