द्रव्यांचे संघटन

संयुगांचे प्रकार

views

4:31
आता आपण संयुगाचे प्रकार पाहूया. सेंद्रिय, असेंद्रिय, जटिल असे संयुगांचे प्रकार आहेत.संयुगांना हवेमध्ये अधिक तीव्र उष्णता दिली की त्यांचा ऑक्सिजनबरोबर संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ तयार होतात. ज्वलन पूर्णपणे न झाल्यास खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन राहतो. या संयुगाना ‘सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे’ असे म्हणतात. उदा: कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन (उदा: पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस) अशी द्रव्ये सेंद्रिय संयुगांची बनलेले असतात. वरील प्रयोगांमध्ये वापरलेले कापूर, साखर, ग्लुकोज, युरिआ ही सेंद्रिय संयुगे आहेत. कारण यांच्या ज्वलनानंतर अवशेष शिल्लक राहतो आणि कार्बन मिळतो. ज्या संयुगाना तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन काही अवशेष उरतो ती संयुगे म्हणजेच ‘असेंद्रिय संयुगे किंवा अकार्बनी संयुगे’ होय. मीठ, सोडा, गंज, मोरचूद, चुनखडी. असेंद्रिय संयुगे आहेत. या व्यतिरिक्त दुसरा प्रकार म्हणजे ‘जटिल संयुगे’ होय. या जटिल संयुगामध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते. या संरचनेच्या मध्यभागात धातूंचे अणू असतात. उदा: मॅग्नेशिअमचा समावेश असलेले क्लोरोफिल, लोहाचा समावेश असलेले हिमोग्लोबिन, कोबाल्टचा समावेश असलेला सायनोकोबालमीन म्हणजेच जीवनसत्व B-12 ही सर्व जटिल संयुगे आहेत. संयुगाच्या रेणूंमध्ये वेगवेगळे अणू असतात. आणि हे अणू रासायनिक बंधांनी जोडलेले असतात.