द्रव्यांचे संघटन

द्रावण

views

4:09
दोन किंवा त्यापेक्षा जास्त पदार्थांच्या समांगी मिश्रणाला ‘द्रावण’ असे म्हणतात. मागील प्रयोगाच्या कृतीत चंचुपात्रात पाणी व मीठ हे एकमेकांत मिसळले आहे. या मिश्रणाला मिठाचे ‘पाण्यातील द्रावण’ असे म्हणतात. द्रावणामध्ये जो घटकपदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो. त्याला ‘द्रावक’ असे म्हणतात. तर या द्रावकापेक्षा कमी प्रमाणात जे पदार्थ असतात, त्या पदार्थांना ‘द्राव्य’ असे म्हणतात. द्राव्य हे द्रावकात मिसळते आणि त्याचे द्रावण बनते. या द्रावण बनण्याच्या क्रियेलाच विरघळणे असे म्हणतात. द्रावणातील स्थायू, द्रव, वायू या अवस्थांप्रमाणे द्रावणांचे अनेक प्रकार पडतात. द्रवामध्ये स्थायू: समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूद, पाण्यात विरघळणारे मीठ, साखरेचा पाक ही सर्व द्रावणे ‘द्रवामध्ये स्थायू’ ह्या प्रकारात येतात. द्रवामध्ये द्रव: व्हिनेगार विरल सल्फ्युरिक आम्ल हे द्र्वामध्ये द्रव ह्या प्रकारात येतात. वायूमध्ये वायू: ‘हवा’ ही वायूंमध्ये वायू या प्रकारात मोडते. स्थायूंमध्ये स्थायू: पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील ही संमिश्रे एकापेक्षा जास्त स्थायूंच्या मिश्रणाने बनलेले असतात. द्रवामध्ये वायू: क्लोरीनयुक्त पाणी, हायड्रोक्लोरिक आम्ल असे द्रावण हे द्रवामध्ये वायू या प्रकारात येतात. समांगी मिश्रणाचे म्हणजेच द्रावणाचे संघटन संपूर्ण राशीभर एकसारखे असते. द्रावक पारदर्शक द्रव असल्यास द्रावण सुद्धा पारदर्शक असते आणि ते गालन कागदातून आरपार जाते.