द्रव्यांचे संघटन

समजून घेऊ संयुगांना

views

4:03
आता आपण संयुगांविषयी माहिती घेऊ या. सर्वसामान्यपणे एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्र आले की संयुगे तयार होतात असे आपण म्हणतो. द्रव्यांचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येते की, मूलद्रव्ये म्हणजे सर्वात साधे संघटन असलेला द्रव्याचा प्रकार आहे. तसेच संयुग व मिश्रण यांचे संघटन तपासले की, आपल्या लक्षात येईल की, ते दोन किंवा अधिक घटकांपासून बनलेले असते. हे घटक एकमेकांबरोबर जोडलेल्या स्थितीत असतात किंवा स्वतंत्र स्थितीमध्ये असतात, यावरूनच ते द्रव्य हे संयुग आहे किंवा मिश्रण आहे हे ठरविता येते. आता आपण संयुग हे प्रयोगाच्या साहाय्याने समजून घेऊया. या प्रयोगासाठी बाष्पन पात्र, काचकांडी, नालाकृती चुंबक, लोहकीस, गंधक हे साहित्य घ्या. सर्वप्रथम दोन ‘बाष्पनपात्रे’ घ्या. त्यातील पहिल्या बाष्पनपात्रामध्ये 7 ग्रॅम लोहकिस घ्या आणि दुसऱ्या बाष्पनपात्रामध्ये 4 ग्रॅम गंधक चूर्ण घ्या. आता या दोन्ही बाष्पनपात्रांजवळ नालाकृती चुंबक न्या. त्यानंतर पहिल्या पात्रातील लोहकीस दुसऱ्या पात्रात ओता आणि हे मिश्रण काचकांडीने ढवळा. आता या द्रव्याजवळ नालाकृती चुंबक न्या. त्याच मिश्रणाचे आणि द्रव्याच्या रंगांचे निरीक्षण करून खालील तक्त्यात लिहा. तसेच आता हे दुसऱ्या पात्रातील द्रव्य थोडे तापवून थंड होऊ द्या. आता या द्रव्यामध्ये, तसेच त्याच्या रंगामध्ये कोणता बदल झाला?