द्रव्यांचे संघटन

तिरकस गुणाकार पद्धतीने साध्या संयुगाचे रेणुसूत्र लिहिणे

views

5:12
हे रेणुसूत्र ठरवीत असताना सर्वप्रथम घटक मूलद्रव्याची संज्ञा लिहावी लागेल.पायरी1: घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहणे. Cकार्बन Oऑक्सिजन त्यानंतर पायरी2: त्या त्या मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहावी. C O 4 2 त्यानंतर पायरी3: बाणाने दाखविल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करूया. C O 4 2 म्हणजेच C X 2 आणि O X 4 त्यानंतर पायरी4: आता आपण तिरकस गुणाकाराने मिळवलेले सूत्र लिहूया. C2O4 त्यानंतर पायरी5: संयुगाचे रेणुसूत्र लिहावे. मात्र हे रेणुसूत्र लिहताना अंतिम स्वरुपात लिहायचे असेल तर घटक अणूंची संख्या ही लहानात लहान असावी, आणि ती पूर्णांकात असावी. यासाठी गरज पडली तर पायरी क्र.4 मध्ये योग्य त्या अंकांना भाग देऊन बदल करून घ्यावा. म्हणजेच याठिकाणी तिरकस गुणाकार केल्यानंतर मिळालेले सूत्र. C2 O4 ला 2 ने भागून मिळालेले अंतिम रेणुसूत्र असेल CO2 म्हणजे अंतिम रेणुसूत्र हे CO2 आहे. अशाप्रकारे आपण रेणुसूत्र कसे काढायचे हे अभ्यासले.