संच Go Back संच ओळख views 3:51 आज आपण एका नवीन घटकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. संच ही संकल्पना जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर यांनी प्रथम मांडली. मुलांनो, संच या शब्दाचा वापर आपण दैनंदिन जीवनात सुद्धा करतो. संच म्हणजे समूह किंवा संघ होय. कवड्यांच्या जोडया, पुस्तकांचा संच, किल्ल्यांचा जुडगा, पक्षांचा थवा, फुलांचा गुच्छ असे आपण समूह दर्शक शब्द वापरत असतो. आता मी तुम्हांला काही प्रश्न विचारतो त्यातील कोणत्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता ते सांगा.. 1) आठवड्यातील दिवस, नैसर्गिक संख्यांचा समूह, भूमितीतील प्रमेय. 2) तुमच्या वर्गातील आनंदी मुलांची नावे तुम्ही सांगू शकाल का ? 3) तुमच्या वर्गातील दु:खी मुलांची नावे तुम्ही सांगू शकाल का ? यावरून ज्या “समूहातील घटक आपणास अचूक व नेमकेपणाने सांगता येतात. अशा वस्तूच्या समूहांना “संच” असे म्हणतात.” संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे A, B, C, D to Z यांपैकी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरे वापरतात. संचाचे घटक दाखवण्यासाठी a, b, c, d, ............. यांपैकी इंग्रजी अक्षरे वापरतात. a हा संच A चा घटक आहे हे चिन्हात आपण ‘a Є A’ अशाप्रकारे लिहू शकतो. a हा संच A चा घटक नाही हे चिन्हात आपण “a Є A” अशाप्रकारे लिहितो. संच ओळख संच लिहिण्याच्या पद्धती संचांचे प्रकार समान संच वेन आकृती विश्वसंच संचांवरील क्रिया दोन संचांचा संयोग संयोग संचाचे गुणधर्म संचावर आधारित शाब्दिक उदाहरणे