संच

संचांवरील क्रिया

views

4:33
आता आपण संचावरील विविध क्रियांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील सर्वप्रथम आपण दोन संचाचा छेद म्हणजे काय याविषयी जाणून घेऊया. दोन संचाचा छेद: समजा A आणि B हे दोन संच आहेत. A आणि B या संचामधील सामाईक घटकाच्या संचाला A आणि B या संचांचा छेदसंच असे म्हणतात. आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने छेदसंच समजून घेऊया. आता हे दोन संच पाहा. संच A = महिरपी कंसात { 1,2,3,4}, B = महिरपी कंसात {3,4,5,6} 1,2,3,4 हे A या संचाचे घटक आहेत. तर 3,4,5,6 हे B या संचाचे घटक आहेत. या दोन्ही संचात काही घटक म्हणजे 3 व 4 समान दिसत आहेत. यांच्या संचाला A आणि B यांचा छेद संच असे म्हणतात. त्याचे लेखन A∩B असे करतात. आणि वाचन A छेद B असे करतात. म्हणून A छेद B = x हा A चा घटक आहे x हा B चा घटक आहे. आणखी काही उदाहरणांच्या साहाय्याने आपण छेद संच समजून घेऊया. उदा. 1) संच A = महिरपी कंसात {1,3,5,7} संच B = महिरपी कंसात {2,3,6,8} हे वेन आकृतीच्या सहाय्याने पाहूया. संच A आणि संच B मध्ये 3 हा सामाईक घटक आहे. म्हणून A छेद B महिरपी कंसात 3 आहे.