संच

समान संच

views

4:11
आपण समान संच म्हणजे काय ते समजून घेऊया. संच A चा प्रत्येक घटक संच B मध्ये आणि संच B मधील प्रत्येक घटक संच A मध्ये असेल तर ते संच समान संच आहेत असे म्हणतात. A आणि B हे समान संच आहेत हे चिन्हात A = B असे लिहतात. कसे ते या उदाहरणांतून समजून घेऊ. उदा. संच A चा x हा घटक listen या शब्दातील अक्षर आहे A = { x | x हे listen या शब्दातील अक्षर आहे } म्हणून A = महिरपी कंसात { l, i, s, t, e, n } असे लिहू. संच B चा y हा घटक silent या शब्दातील अक्षर आहे B = { y|y हे silent या शब्दातील अक्षर आहे } म्हणून B = { s ,i ,l, e, n, t } असे लिहू. मुलानो संच A आणि B या दोन्ही संचाचे निरीक्षण केले तर दिसून येते की, दोन्ही संचातील घटकांचा क्रम वेगळा जरी असला तरी, घटक मात्र तेच आहेत. म्हणून A व B हे समान संच आहेत. आणि ते A = B अशाप्रकारे लिहतात.