संच

वेन आकृती

views

3:30
आता आपण वेन आकृतीचा अभ्यास करणार आहोत. संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृतीचा उपयोग ब्रिटीश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला. म्हणून अशा आकृत्यांना वेन आकृती असे म्हणतात. “लॉजिक ऑफ चान्स” हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. वेगवेगळ्या संचातील संबंध समजण्यासाठी आणि संचावर आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी या आकृत्यांचा चांगला उपयोग होतो. वेन आकृत्यांनी संच कसे दाखवले जातात ते खालील उदाहरणावरून समजून घेऊया. उदा. A = {1,2,3,4,5} वेन आकृतीने A हा संच दाखवला आहे. आता ही आकृती पहा. (येथे पान क्र. 7 वरील आयतातील आकृती B दाखवा.) या आकृतीत संच B चा x हा घटक आहे व x ही 0 पेक्षा लहान व -10 पेक्षा मोठी संख्या आहे. B = { x -10 < x < 0, पूर्णांक } ही वेन आकृती B संच दर्शवते. मुलांनो, हे लक्षात ठेवा की, संच दाखवण्यासाठी वर्तुळे व लंबवर्तुळे यांच्यापेक्षा निराळ्या आकृत्याही वापरतात व संचाचे घटक बिंदूंनी दर्शवतात.