संच

दोन संचांचा संयोग

views

3:36
मुलांनो, आता आपण दोन संचाचा संयोग म्हणजे काय हे पाहणार आहोत. यातील संच A = महिरपी कंसात {1,2,3,4,} कंस B = महिरपी कंसात {3,4,5,6,} आहे. आता हे दोन संच पाहा संच A मध्ये 1,2,3,4 व संच B मध्ये 3,4,5,6 हे घटक आहेत. यातील 1 आणि 2 हे फक्त संच A चा घटक आहेत. 3 आणि 4 हे संच A आणि संच B चे घटक आहेत. तर 5 आणि 6 हे फक्त संच B चे घटक आहेत. संच {1,2,3,4,5,6} या संचाला A आणि B चा संयोग संच म्हणतात. संयोग संच ‘∪’ या चिन्हाने दर्शवतात. A संयोग B बरोबर महिरपी कंसात 1,2,3,4,5,6 संयोग संचात येणारा प्रत्येक घटक एक तर A चा किंवा B किंवा दोघांचाही घटक असतो. उदाहरणार्थ लग्न समारंभात कार्यालयात आलेली माणसे म्हणजे वधूकडील आणि वराकडील माणसांच्या संचाचा संयोग संच होय. त्यातील काही जणांना वधूकडून आणि वराकडून असे दोन्हीकडूनही निमंत्रण असते. अशा व्यक्तींचा संच म्हणजे दोन संचाचा छेदसंच होय. आता ही आकृती पहा यातून तुम्हांला अधिक समजेल. उदा1). या आकृतीत A आणि B हे दोन संच आहेत. या दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला A आणि B या संचांचा संयोग संच म्हणतात. तो A ∪ B असा लिहितात. आणि A संयोग B असा वाचतात. संच A संयोग B चा घटक x हा आहे. x हा A चा घटक आहे किंवा x हा B चा घटक आहे.