संच

संचावर आधारित शाब्दिक उदाहरणे

views

2:46
उदा1) एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. त्यांपैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळ आवडतो. 52 विद्यार्थ्यांना खो – खो हा खेळ आवडतो. असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला यांपैकी एकही खेळ आवडत नाही. तर क्रिकेट आणि खो-खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा. फक्त क्रिकेट आवडणारी मुले किती ? वरील उदाहरण आपण दोन पद्धतीने सोडवूया. रीत-2) वेन आकृतीच्या साहाय्याने दोन्ही खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढता येते. (page 15 वरील रीत 2 ची आकृती दाखवा) A छेद B संचातील घटकांची संख्या n(A ∩ B) = x मानू. A संचातील घटकांची संख्या n(A) = 45, व B संचातील घटकांची संख्या n(B) = 52 आहे. A संयोग B संचातील घटकांची संख्या (A ∪ B) = 70 हे आपल्याला माहित आहे. ∴A छेद B संचातील घटकांची संख्या= A संचातील घटकांची संख्या + B संचातील घटकांची संख्या – A छेद B संचातील घटकांची संख्या (n(A ∩ B) = n (A) + n (B) - n(A ∩B) = 52 + 45 – 70 = 97 – 70 = 27. ∴ वेन आकृतीवरून फक्त क्रिकेट आवडणारी मुले = 45 – 27 = 18 आहेत. अशाप्रकारे आपण या पाठातून विविध संचाचा अभ्यास केला.