संच

संच लिहिण्याच्या पद्धती

views

4:02
आता आपण संच लिहिण्याच्या पद्धतींचा अभ्यास करूया. संच लिहिण्यासाठी दोन पद्धतींचा वापर केला जातो. यादी पद्धत (Listing method) आणि गुणधर्म पद्धत (roster method). यादी पद्धत : मुलांनो, यादी पद्धतीमध्ये संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकामध्ये स्वल्पविराम देतात. यादी पध्दतीमध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो. पण सगळे घटक वेगळे दाखवणे आवश्यक असते. यादी पद्धतीची काही उदाहरणे पहा: उदा. 1) 1 ते 10 मधील विषम संख्याचा संच यादी पद्धतीने लिहा. 1 ते 10 मध्ये 3,5,7,9 या विषम संख्या आहेत. म्हणून संच A = महिरपी कंसात 7,3,5,9 A = { 3,5,7,9 } किंवा संच A = महिरपी कंसात 7,3,5,9 A = { 7, 3,5,9 } अशा पद्धतीने लिहू शकतो. उदा. 2) REMEMBER या शब्दातील अक्षरांचा संच लिहा. REMEMBER या शब्दात R, E, M, B ही अक्षरे एकापेक्षा जास्त वेळा आली असली तरी संचात मात्र ती एकदाच लिहिली जातात. म्हणून संच B = महिरपी कंसात R, E, M, B B = { R, E, M, B } असा संच लिहितात.