संच

संचांचे प्रकार

views

4:13
संचाचे एकघटक संच, रिक्त संच, सांत संच व अनंत संच असे चार प्रकार आहेत. एकघटक संच (Singleton Set) :- ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हणतात. उदा. संच A = महिरपी कंसात 2. A = { 2 } A हा सममूळ संख्यांचा संच आहे. कारण 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. रिक्त संच :- ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो. त्यास रिक्त संच म्हणतात. रिक्त संच { } महिरपी किंवा Ø (फाय) या चिन्हाने दाखवतात. सांत संच :- जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते किवा मोजता येते त्याला सांत संच म्हणतात. अनंत संच :- ज्या संचातील घटकाची संख्या अमर्यादित असते व ती मोजता येत नाही, त्याला अनंत संच म्हणतात. उदा. N = महिरपी कंसात { 1,2,3,4.......} कारण नैसर्गिक संख्या आपण मोजू शकत नाही. त्या अनंत अमर्याद असतात.