उष्णतेचे मापन व परिणाम

उष्णतेचे स्त्रोत

views

2:20
आता आपण उष्णतेच्या स्त्रोतांविषयी माहिती घेऊया. उष्णता ही आपल्याला अनेक स्त्रोतांपासून मिळते हे आपल्याला माहीतच आहे. यातील सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे सूर्य होय. तर आता आपण सूर्यविषयी माहिती घेऊ. 1) सूर्य: पृथ्वीला सर्वात जास्त ऊर्जा ही सूर्यापासून मिळते. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणामुळे खूप मोठया प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. या केंद्रकीय एकीकरण पद्धतीमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात. या केंद्राकातून ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेतील काही ऊर्जा ही प्रकाश व उष्णतेच्या स्वरुपात पृथ्वीपर्यंत पोहचवली जाते. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा मुबलक आहे. म्हणून सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. 2) पृथ्वी: पृथ्वी केंद्रकामध्ये तापमान हे सर्वाधिक असते. म्हणून पृथ्वी हा सुद्धा उष्णतेचा स्त्रोत आहे आणि या उष्णतेलाच भू- औष्णिक ऊर्जा असे म्हंटले जाते. 3) रासायनिक ऊर्जा: लाकूड, कोळसा, पेट्रोल, अशा इंधनाचे ज्वलन केले की, ऑक्सिजन बरोबर यांची रासायनिक प्रक्रिया होते व यांपासून उष्णता निर्माण होते. यालाच आपण रासायनिक ऊर्जा असे म्हणतो. 4) विदयुत ऊर्जा: विजेवर चालणारी अनेक उपकरणे आपण वापरतो. जसे इस्त्री, विजेवर चालणारे दिवे, पाणी गरम करण्यासाठी लागणारे हिटर इत्यादी. या स्त्रोतांमधूनही उष्णता मिळते. 5) अणु ऊर्जा: अणु उर्जेच्या प्रकल्पामध्ये मोठया प्रमाणात उर्जेची गरज असते. त्यावेळेस युरेनियम, थेरीअम अशा अणूंच्या केंद्रकाचे विभाजन केले असता अत्यंत थोड्या कालावधीत मोठया प्रमाणात ऊर्जा व उष्णता निर्माण होते. म्हणून अणूऊर्जा ही सुद्धा उष्णतेचा एक स्त्रोत आहे.