उष्णतेचे मापन व परिणाम

कॅलरीमापी

views

4:29
वस्तूचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जाते. तर वस्तूची उष्णता मोजण्यासाठी कॅलरीमापी वापरतात. या कॅलरीमापीच्या मदतीने एखाद्या रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या किंवा शोषल्या जाणाऱ्या उष्णतेचे मापन केले जाते. यामध्ये आत व बाहेर अशी दोन भांडी असतात. आतील भांड्यामुळे आतमध्ये असणाऱ्या वस्तूची उष्णता ही बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरील उष्णता आत येऊ शकत नाही. म्हणजेच आतील भांडे व त्यातील वस्तू वेगळ्या ठेवल्या जातात. हे भांडे तांब्याचे असते. यामध्ये तापमान मोजण्यासाठी एक तापमापी व त्यातील द्रव ढवळण्यासाठी एक कांडी बसवलेली असते. अशाप्रकारे कॅलरीमापीची रचना दिसून येते. बर आता मला सांगा ताप आल्यानंतर आई तुमच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवते? शरीरातील तापमान कमी व्हावे म्हणून. आपल्या शरीरातील उष्णता लवकर बाहेर जावी म्हणून आई आपल्या कपाळावर पट्ट्या ठेवते. पाण्यामुळे उष्णता लवकर कमी होते कारण पाण्याचा विशिष्ट उष्मा खूप जास्त असतो. बर सांगा कॅलरीमापी तांब्याची का बनवतात?