उष्णतेचे मापन व परिणाम

स्थायूचे प्रतलीय प्रसरण

views

5:13
स्थायूच्या एकरेषीय प्रसरणाप्रमाणेच स्थायूच्या पत्र्याचे जर तापमान वाढविले तर त्या पत्र्याचे क्षेत्रफळ वाढते. यालाच स्थायूचे प्रतलीय प्रसरण असे म्हणतात. ते खालील सूत्राने दिले जाते. A2 = A1(1+ σ∆T) (1 + सिग्मा डेल्टा T) या ठिकाणी ∆T (डेल्टा टी) हा तापमानातील बदल आहे. व A1 व A2 ही पत्र्याची आरंभी व शेवटची क्षेत्रफळे आहेत. या उदाहरणामध्ये σ (सिग्मा) हा पदार्थाचा द्वीघाती किंवा प्रतलीय प्रसरणांक आहे. स्थायूचे घनीय प्रसरण: पत्र्यासारखेच जर स्थायूच्या त्रिमितीय तुकडयाला उष्णता दिली की त्याचे सर्वच बाजूने प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते. यालाच स्थायूचे घनीय प्रसरण असे म्हणतात. V2= V1 (1+ β∆T).(1 + बीटा डेल्टा T)............... (10) ते आपण याप्रमाणे सूत्रात लिहू शकतो. या ठिकाणी ∆T(डेल्टा टी) हा तापमानातील बदल आहे. व V2 व V1 ही स्थायूची आरंभीची व अंतिम आकारमाने आहेत. β (बीटा) हा पदार्थाचा घनीय प्रसरणांक आहे. अशाप्रकारे हे स्थायुचे घनीय प्रसरण घडून येते.