उष्णतेचे मापन व परिणाम

तापमान

views

4:18
आता आपण तापमानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. एखादी वस्तू उष्ण आहे किंवा थंड आहे हे तीचे तापमान दर्शवत असते. तापमानामुळे उष्णतेच्या प्रवाहाची दिशा निश्चित होत असते. जेव्हा एखादा पदार्थ उष्ण किंवा थंड जाणवतो तेव्हा ही संवेदना सापेक्ष असते. मग आता हे समजण्यासाठी आपण एक प्रयोग करूया तीन सारखी भांडी घेऊन त्याला अ,ब,क अशी नावे द्या. 'अ' भांडयामध्ये थोडे गरम पाणी तर 'ब' भांडयामध्ये थंड पाणी टाका. आणि तिसऱ्या भांडयात म्हणजेच 'क' भांडयामध्ये 'अ' व 'ब' भांड्यांतील थोडे- थोडे पाणी टाका. आता या भांडयापैकी 'अ' भांडयामध्ये तुमचा उजवा हात व 'ब' भांडयामध्ये, तुमचा डावा हात बुडवा आणि ह्या स्थितीत आपण 2ते3 मिनिटे थांबा. त्यानंतर तुमचे दोन्ही हात 'क' भांडयामध्ये बुडवा. उजव्या हाताला पाणी थंड जाणवले कारण उष्णतेचे स्थलांतरण हे त्या हाताकडून पाण्याकडे होते. व डाव्या हाताला तेच पाणी गरम जाणवते, कारण उष्णतेचे स्थलांतरण पाण्याकडून हाताकडे होते. या कृतीवरून आपल्या लक्षात येते की, फक्त स्पर्श केल्याने एखादया पदार्थाचे किंवा वस्तूचे तापमान हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. तसेच गरम वस्तूला स्पर्श केल्यामुळे इजा होण्याचीही भीती असते. त्यामुळे आपण तापमान मोजण्यासाठी उपकरणाची मदत घेतो. या उपकरणालाच तापमापी असे म्हणतात. या तापमापीच्या रचनेविषयी आपण पुढे माहिती घेऊ.