उष्णतेचे मापन व परिणाम

तापमापी

views

4:19
मला सांगा तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर ताप मोजण्यासाठी काय वापरतात? तापमापी. त्या तापमापीलाच वैद्यकीय तापमापी असे म्हणतात. तापमापी ही वेगवेगळ्या मापनासाठी वेगवेगळी वापरली जाते. साधारण(साधी) तापमापी: या तापमापीमध्ये एक काचेची अरुंद नळी असते. तिच्या टोकाकडे एक फुगा असतो. या फुग्यात पूर्वी पारा भरलेला असायचा. मात्र पारा हा हानिकारक असल्यामुळे अलीकडच्या काळात तापमापीमध्ये पाऱ्याऐवजी अल्कोहोल वापरले जाते. नळीची उरलेली जागा ही मोकळी असते व नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते. ज्या वस्तूचे तापमान मोजायचे आहे त्या वस्तूच्या संपर्कात काही काळ तापमापीचा फुगा ठेवला जातो. त्यामुळे त्याचे तापमान हे वस्तूच्या तापमानाएवढे होते. वाढलेल्या तापमानामुळे अल्कोहोलचे प्रसरण होते व नळीतील त्याची पातळी वाढते. आणि या वाढणाऱ्या पातळीवरून तापमानाची नोंद घेतली जाते. तापमान मोजण्यासाठी नळीवर क्रमांक, किंवा रेषा चिन्हांकित केलेल्या असतात.