गुणोत्तर व प्रमाण

समप्रमाण

views

2:06
आपण समप्रमाण म्हणजे काय ते उदाहरणांद्वारे समजून घेऊ. उदा1) एक मोटरगाडी 1 लीटर पेट्रोलमध्ये 10 किमी अंतर जाते. म्हणून 20 लीटर पेट्रोलमध्ये ती गाडी 20 × 10 = 200 किमी अंतर कापेल. तर 40 लीटर पेट्रोलमध्ये तीच गाडी 40 × 10 = 400 किमी अंतर जाईल. म्हणून, पेट्रोल व अंतराचे गुणोत्तर ( x)/( y) मानू. वरील सर्व माहिती सारणी रूपात लिहिली आहे. या राशींचे गुणोत्तर स्थिर आहे. अशा वेळी या दोन्ही राशी समप्रमाणात असतात. म्हणजेच या दोन राशी समचलनात बदलतात असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाले तर एखाद्या वस्तूची बाब वाढली असता त्यासंबंधी दुसरी बाब पण वाढते तेव्हा त्याच्यामध्ये समप्रमाण असते. तसेच एखादी बाब कमी झाली तर दुसरी बाब पण कमी होते.