गुणोत्तर व प्रमाण

परंपरित प्रमाण

views

4:03
आता आपण परंपरित प्रमाण याविषयी जाणून घेऊया. 4:12 आणि 12:36 या दोन गुणोत्तरांचा विचार करू, ही गुणोत्तरे समान आहेत. या दोन प्रमाणांतील पहिल्याचे उत्तरपद आणि दुसऱ्याचे पूर्वपद समान आहे. म्हणून 4,12,36 या संख्या परंपरित प्रमाणात आहेत असे म्हणतात. जेव्हा a/b=b/c तेव्हा a, b, c या संख्या परंपरित प्रमाणात आहेत असे म्हणतात. जर ac = b2 , तर दोन्ही बाजूंना bc ने भागून a/b=b/c हे समीकरण मिळते. म्हणून, ac = b2 असेल, तर a, b, c परंपरित प्रमाणात असतात. जेव्हा a, b, c परंपरित प्रमाणात असतात तेव्हा b ला a आणि c यांचा ‘भूमितीय मध्य’ किंवा ‘मध्यम प्रमाण पद’ म्हणतात. यावरून लक्षात घ्या, की खालील सर्व विधाने समान अर्थाची आहेत. १) a/b=b/c २) b2 = a c ३) a, b, c परंपरित प्रमाणात आहेत. ४) b हा a व c यांचा भूमितीमध्य आहे. ५) b हे a व c चे मध्यम प्रमाणपद आहे. परंपरित प्रमाणाची संकल्पनासुद्धा विस्तारित करता येते. जर a/b=b/c=c/d=d/e=e/f असेल तर a, b, c, d, e आणि f या संख्या परंपरित प्रमाणात आहेत, असे म्हणतात. कसे ते खालील उदाहरणांतून समजून घेऊ.