गुणोत्तर व प्रमाण

गुणोत्तराचे गुणधर्म

views

3:31
आता आपण गुणोत्तराचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. 1) a आणि b या दोन संख्यांचे गुणोत्तर a : b किंवा a/b अशा स्वरूपात लिहितात. येथे a ला पूर्वपद म्हणजेच (पहिले पद) आणि b ला उत्तर पद म्हणजेच (दुसरे पद) म्हणतात . 2) दोन संख्यांच्या गुणोत्तरात उत्तरपद 100 असते तेव्हा त्या गुणोत्तरास शतमान असे म्हणतात. 3) प्रमाणातील सर्व संख्यांना एकाच शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले तर ते प्रमाण बदलत नाही. उदा. 3:4 = 6:8 = 9:12 तसेच 2:3:5 = 8:12:20 किंवा k ही शून्येतर संख्या असेल, तर a : b = ak : bk. a:b:c = ak:bk:ck असे असते. 4) ज्या संख्यांचे गुणोत्तर काढायचे आहे त्या एकाच प्रकारच्या मापनाच्या असल्या तर प्रत्येकीच्या मापनाचे एकक समान असले पाहिजे. 5) गुणोत्तराला एकक नसते. जसे, 2 किलोग्रॅम व 300 ग्रॅम यांचे गुणोत्तर 2:300 नसते. परंतु 2 किलोग्रॅम = 2000 ग्रॅम म्हणून ते गुणोत्तर 2000 : 300 म्हणजेच 20:3 होईल.