प्रकाशाचे अपवर्तन

काचेच्या लादीतूनदेखील प्रकाशाचे अपवर्तन

views

3:18
एक काचेची लादी घेऊन ती कागदावर ठेवून पेन्सिलच्या साहाय्याने तिच्या बाह्य कडा आखून घ्या. त्यांना PQRS असे नाव द्या. काचेच्या लादीच्या PQ या बाजूला छेदणारी तिरकस रेषा काढा. ती रेषा PQ ला N बिंदूत छेदते आणि त्यावर A व B अशा दोन टाचण्या उभ्या करा. आता ज्या बाजूला टाचण्या लावल्या आहेत, त्याच्या विरुद्ध बाजूने काचेच्या लादीतून A व B टाचण्यांच्या प्रतिमा बघा. त्या प्रतिमा सरळ रेषेत येतील अशा रीतीने C व D अशा दोन टाचण्या टोचा. आता काचेची लादी व टाचण्या बाजूला काढून घेऊन टाचण्या C व D टोचल्याच्या खुणा जोडणारी रेषा. बाजू SR पर्यंत वाढवा. ती SR ला M बिंदूत छेदते. नंतर बिंदू M व N जोडा. तुम्हांला ही आकृती तयार झालेली दिसेल.आता आकृतीतील आपाती किरण AN व निर्गत किरण MD यांचे निरीक्षण करा.