प्रकाशाचे अपवर्तन

अपवर्तनाचे नियम

views

5:35
नियम1: आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी(N) असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे CD च्या विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्ती किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आकृतीचे निरीक्षण केले असता तुमच्या लक्षात येईल की या नियमानुसार आपाती किरण AN व अपवर्तित किरण NB आणि स्तंभिका CD ही एकाच प्रतलात आहेत. नियम2: दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता, येथे हवा व काच, Sin i व Sin r यांचे गुणोत्तर स्थिर असते. येथे i हा आपाती कोन असून r हा अपवर्ती कोन आहे. म्हणजेच, Sini/Sinr = n = (स्थिरांक) आहे. येथे n या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. या नियमालाच स्नेलचा नियम असेही म्हणतात. दोन माध्यमांच्या सीमेला लंब रेषेत आपाती असलेला किरण (i = o) त्याच रेषेत पुढे जातो. (r = o).