प्रकाशाचे अपवर्तन

आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन

views

5:50
जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो, तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होते म्हणजे परावर्तनच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो. ह्यास आंशिक परावर्तन असे म्हणतात. प्रकाशाच्या उरलेल्या भागाचे अपवर्तन होते. प्रकाशाचे पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमात मार्गक्रमण दाखवले आहे. येथे तिरकस मार्गाने जाणारा प्रकाशकिरण अपवर्तनात स्तंभिकेपासून दूर जातो. यावेळी अपवर्तन कोन r हा आपाती कोन i पेक्षा जास्त असतो. आता anw = Sini/Sinr<1 आहे. येथे anw हा हवेच्या पाण्याच्या संदर्भात अपवर्तनांक होय. anw हा स्थिरांक असल्याने i वाढवल्यास r वाढत जातो. r = 900 असताना, प्रकाशकिरण पाण्याच्या पृष्ठभागास समांतर जाईल. r आणखी वाढवल्यास r>900 शक्य नसल्याने प्रकाश हवा या माध्यमात न शिरता, म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन न होता, त्याचे पूर्णपणे पाण्यामध्ये परावर्तन होईल. यास प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणतात. r = 900 असताना, anw = Sini/Sinr = sin i.