प्रकाशाचे अपवर्तन Go Back ताऱ्याची आभासी स्थिती views 5:09 वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे होय. तारे स्वयंप्रकाशित असल्याने चमकतात व सूर्यप्रकाश नसल्याने रात्री आपल्याला दिसतात. तारे आपल्यापासून खूप जास्त अंतरावर आहेत. त्यामुळे ते आपल्याला प्रकाशाचे बिंदूरूप स्रोत असल्याचे जाणवते. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो. कारण हवेची घनता वाढत जाते. वातावरणातून तारका – प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका – प्रकाश स्तंभिकेकडे झुकल्यामुळे या आकृतीत दाखविल्याप्रमाणे तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोड्याशा उंचावर असल्याचे भासते. ताऱ्यांची ही आभासी स्थितीस्थिर नसून किंचित बदलत राहते. कारण जेव्हा प्रकाशकिरण तिरकस मार्गाने विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. तर घन माध्यमातून विरल माध्यमात जातांना तो स्तंभिकेपासून दूर जातो. थंड हवा गरम हवेपेक्षा कमी विरल असते. त्यामुळे थंड हवेचा अपवर्तनांक गरम हवेच्या अपवर्तनांकापेक्षा जास्त असतो. तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते. म्हणजेच वातावरण नेहमी अस्थिर असते. सतत हवेची हालचाल होत असते. वातावरणाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घनता व तापमान एकसमान नसतात. वातावरणाच्या बदलत्या अपवर्तनांकामुळे सर्वसाधारणतः प्रकाशकिरणाचा वातावरणातील मार्ग वक्र असतो. अशाप्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते व त्यामुळे तारे लुकलुकतांना दिसतात. प्रस्तावना काचेच्या लादीतूनदेखील प्रकाशाचे अपवर्तन अपवर्तनाचे नियम वेगवेगळ्या माध्यमांत प्रकाशाचे अपवर्तन ताऱ्यांचे लुकलुकणे ताऱ्याची आभासी स्थिती प्रकाशाचे अपस्करण आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन