प्रकाशाचे अपवर्तन

वेगवेगळ्या माध्यमांत प्रकाशाचे अपवर्तन

views

2:27
प्रामुख्याने प्रकाशाच्या मार्गक्रमणाची दोन माध्यमे आहेत. ते म्हणजे विरल माध्यम व दुसरे घन माध्यम.दिलेल्या माध्यमांच्या जोडीमधील कमी अपवर्तनांक असलेल्या माध्यमास विरल माध्यम म्हणतात, तर जास्त अपवर्तनांक असलेल्या माध्यमास घन माध्यम म्हणतात. उदाहरणार्थ हवा व काच यांच्यामध्ये हवेचा अपवर्तनांक कमी असल्याने हवा हे विरल माध्यम आहे तर काचेचा अपवर्तनांक जास्त असल्याने काच हे घन माध्यम आहे. परंतु पदार्थाची घनता अधिक असल्यास त्याचा अपवर्तनांक अधिक असतोच असे नाही. उदाहरणार्थ पाण्याच्या तुलनेत केरोसीनची घनता कमी आहे, पण केरोसीनचा निरपेक्ष अपवर्तनांक पाण्याच्या निरपेक्ष अपवर्तनांकापेक्षा जास्त आहे.पाणी व केरोसीन यांमध्ये प्रकाशाच्या मार्गक्रमणाचा विचार केला तर पाणी हे विरल माध्यम आहे, तर केरोसीन हे घन माध्यम होय.