प्रकाशाचे अपवर्तन

प्रकाशाचे अपस्करण

views

5:08
तुम्ही कंपासमधील प्लास्टिकची पट्टी प्रकाशात डोळ्यांसमोर धरून हळूहळू तिरकी करून पहा आणि तुम्हांला काय दिसते ते सांगा. कंपासमधील प्लास्टिकची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरली असता वेगवेगळ्या रंगाचे पट्टे दिसतात. तुम्हांला प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगात विभक्तीकरण झालेले दिसून येते. त्याचप्रमाणे शुभ्र प्रकाशाचे प्रिझमद्वारा सात रंगात अपस्करण होते. यावेळी आपाती किरणाच्या मानाने वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात. प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणारा रंगाचा क्रम तांबडा, नारंगी, पिवळा, निळा, पारवा, जांभळा असा असतो.तसेच प्रकाश हे विद्युत चुंबकीय प्रारण आहे. हे आपल्याला माहीतच आहे. तरंगलांबी हा प्रारणांचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आपले डोळे जे प्रारण बघण्यासाठी संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंगलांबी 400nm ते 700nm च्या दरम्यान असते. या दरम्यान दिसणारी तरंगलांबीची प्रारणे ही तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा या वेगवेगळ्या रंगांत असतात. या रंगांमध्ये तांबड्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात अधिक म्हणजे 700nm च्या जवळ असते, तर जांभळ्या किरणांची तरंगलांबी ही सगळ्यात कमी म्हणजे 400nm च्या जवळ असते (1nm = 10-9m आहे.)