प्रकाशाचे अपवर्तन

ताऱ्यांचे लुकलुकणे

views

3:23
प्रकाशाच्या बदलत्या अपवर्तनामुळे उन्हाळ्यात दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण वस्तूच्या जमिनीवर असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात. यालाच आभास (मृगजळ) म्हणतात. सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन तापल्यावर हवेचे तापमानही वाढते. हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे जमिनीलगत कमी घनता व कमी अपवर्तनांक असलेल्या गरम हवेचा थर तयार होतो. थंड हवेच्या तुलनेत गरम हवा हे प्रकाशाच्या मार्गक्रमणाच्या दृष्टीने विरल माध्यम असते. थंड हवेच्या तुलनेत गरम हवेचा अपवर्तनांक कमी असतो. तापमानात बराच फरक पडल्याने उंचीप्रमाणे हवेची विरलता बदलत जाते व अपवर्तनांकही बदलत जातो. त्यामुळे प्रकाशाचे अपवर्तन होताना अपवर्ती कोन सतत बदलत राहतो. मोटार अथवा झाड यांसारख्या वस्तूंच्या वरच्या टोकाकडून जमिनीवरील निरीक्षकाकडे येणाऱ्या प्रकाशकिरणांचा मार्ग सतत बदलत असतो. त्याचवेळी अशावस्तूच्या खालच्या भागाकडून निघणारे प्रकाशकिरणही निरीक्षकाकडे येत असतात. परिणामी वस्तूची प्रतिमा उलट दिसू लागते. ही प्रतिमा वस्तूच्या खालच्या बाजूला गरम हवेच्या दिशेने तयार होते. यावेळी काही प्रकाशकिरण आधी खाली वळतात. नंतर मग वर वळतात. त्यामुळे मृगजळामध्ये तापलेल्या जमिनीलगतच्या गरम हवेच्या थरथरण्यामुळे तेथे पाणी असल्याचा भास आपल्याला होतो.