वर्तुळ

प्रस्तावना

views

03:15
आजपर्यंत आपण वर्तुळावर आधारित विविध प्रकारची उदाहरणे शिकलो आहेत. वर्तुळाचे घटक, त्याच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास केला आहे. प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. त्या स्थिर बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा वर्तुळकेंद्र असे म्हणतात. त्रिज्या: वर्तुळकेंद्रापासून वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. जीवा: वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाची जीवा असे म्हणतात. व्यास: वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास म्हणतात. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते.