वर्तुळ

त्रिकोणाचे परिवर्तुळ

views

04:43
या गुणधर्माचा पडताळा विविध त्रिकोण काढून घेतला आहे. त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदूभाजकांचा संपातबिंदू ‘C’ या अक्षराने दाखवतात. ही शेजारील आकृती पहा. या आकृतीत PQR च्या बाजूंचे लंबदुभाजक C या बिंदूत मिळाले आहेत. म्हणून C हा लंबदुभाजकाचा संपातबिंदू आहे. बिंदू C हा त्रिकोण PQR च्या तिन्ही बाजूंच्या लंबदुभाजकांवरचा बिंदू आहे. PC, QC, RC जोडा. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. बिंदू C हा रेख PQ च्या लंबदुभाजकावर आहे. म्हणून PC = QC ---------- I बिंदू C हा रेख QR च्या लंबदुभाजकावर आहे. म्हणून QC = RC ----------- II PC = QC = RC (विधान I व II वरून) C बिंदू केंद्र घेऊन व PC ही त्रिज्या घेऊन काढलेले वर्तुळ या त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जाईल अशा वर्तुळाला त्रिकोणाचे परिवर्तुळ म्हणतात.