वर्तुळ

कृती 1

views

04:41
1) कंपासमध्ये सोईनुसार मापे घ्या व वर्तुळे काढा. 2) पट्टीच्या साहाय्याने प्रत्येक वर्तुळात समान लांबीच्या दोन जीवा काढा i) जीवा AB = जीवा CD = 3.4cm ii) जीवा LM = जीवा ON = 4cm जीवा XY = 3.8 सेमी 3) कोनमापक व पट्टीच्या मदतीने वर्तुळकेंद्रातून प्रत्येक जीवेवर लंब काढा. 4)वर्तुळकेंद्रापासून प्रत्येक जीवेचे अंतर मोजा. वर्तुळकेंद्रापासून जीवेचे अंतर मोजले असता आपल्या लक्षात येईल की समान मापाच्या जीवा एकाच वर्तुळातील वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर आहेत. जसे की, वर्तुळ (ii) मध्ये पहा. जीवा LM व जीवा ON समान मापाच्या आहेत, तर त्यांचे वर्तुळकेंद्रापासून अंतर समान आहे. पण जीवा XY ही वेगळ्या मापाची आहे. ती जीवा केंद्रबिंदूपासून वेगळ्या अंतरावर आहे.