वर्तुळ

वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म

views

03:52
आता आपण वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म जाणून घेऊ या. गटातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वहीत एक वर्तुळ काढा. त्यात एक जीवा काढा. वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब टाका. जीवेचे दोन भाग झाले. प्रमेय: वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. कृती2: आपल्या वहीत एक वर्तुळ काढा. त्यात एक जीवा काढा. जीवेचा मध्य शोधा. तो मध्यबिंदू व वर्तुळकेंद्र जोडणारा रेषाखंड काढा. त्या रेषाखंडाने जीवेशी केलेले कोन मोजा. जीवेचा मध्यबिंदू व वर्तुळाचा केंद्रबिंदू जोडला असता 900 अंशाचा काटकोन तयार होतो. प्रमेय: वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. पक्ष: O केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख AB ही जीवा आहे. जीवा AB चा P हा मध्यबिंदू आहे. म्हणजेच रेख AP ≅ एकरूप रेख BP आहे. साध्य: रेख OP ⊥ (लंब) जीवा AB रचना: त्रिज्या OA व OB काढूया.