वर्तुळ

त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ

views

04:08
मागील इयत्तेमध्ये आपण विविध त्रिकोण काढून त्यांचे कोनदुभाजक एकसंपाती असतात, या गुणधर्माचा पडताळा घेतला आहे. त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा संपातबिंदू “I” या अक्षराने दर्शवतात हे आपल्याला माहीतच आहे. आता आपण त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ कसे काढतात याचा अभ्यास करूया. सुरुवातीला आपण कच्ची आकृती काढून दिलेली माहिती त्यात दाखवूया. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ म्हणतात. आणि त्या वर्तुळाच्या केंद्राला अंतर्वर्तुळ केंद्र किंवा अंतर्मध्य किंवा अंतर्केंद्र असे म्हणतात.