अर्थनियोजन

शेअर बाजार

views

03:02
शेअर बाजार: मुंबईतील मुंबई शेअर बाजार(बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE) व राष्ट्रीय शेअर बाजार (नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE) हे भारतातील दोन मुख्य शेअर बाजार आहेत. मुंबई शेअर बाजार हा आशियातील सर्वांत जुना व राष्ट्रीय शेअर बाजार हा भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे. शेअर बाजारमधील चढ उतार समजण्यासाठी SENSEX (सेन्सेक्स) व NIFTY (निफ्टी) असे दोन मुख्य निर्देशांक (Index) आहेत. SENSEX हा शब्द SENSitive + indEX या दोन शब्दांनी तयार झाला आहे. BSE ने 1-1-1986 मध्ये SENSEX द्यायची सुरुवात केली. सर्वात जास्त भाग-भांडवल असलेल्या नामांकित व प्रस्थापित अशा 30 कंपन्यांच्या भावातील चढ-उतारानुसार SENSEX ठरतो. निफ्टी हा शब्द त्याच्या नावाप्रमाणे दोन शब्दांनी बनला आहे. NIFTY=NSE + FIFTY. ‘निफ्टी’ हा शब्द राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या 50 कंपन्यांवरून ठरतो.