अर्थनियोजन

शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर

views

04:09
शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर: 1) दलाली (Brokerage): शेअर्सची खरेदी-विक्री खाजगी रीतीने करता येत नाही. ती शेअरबाजारातील अधिकृत व्यक्ती किंवा संस्थांकडून केली जाते. त्यांना ‘शेअर दलाल’ (Share Broker) म्हणतात. दलालामार्फत शेअर्सची खरेदी करताना व विक्री करताना बाजारभावावर ज्या दराने दलाल रक्कम घेतो, तिला ‘दलाली’ म्हणतात. म्हणजे शेअर्स विकणारा व खरेदी करणारा दोघेही दलाली देतात.