अर्थनियोजन

म्युच्युअल फंड

views

05:41
म्युच्युअल फंड: शेअर्सचा अभ्यास करताना आपण पाहिले, की कंपनी स्थापन करण्यासाठी इच्छुक व्यक्ती एकत्र येतात आणि समाजाचा सहभाग घेऊन मोठे भांडवल उभे करतात. कंपनीची कामिगिरी सरस ठरली तर या सर्व शेअरधारकांना त्याचा फायदा होतो. त्यांना लाभांश मिळतो. शेअर्सचे बाजारभाव वाढतात म्हणून लाभ होतो. कंपनीचे भांडवल वाढते, पर्यायाने देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. थोडक्यात हे समाजशास्त्राचे तत्त्व आहे. ‘Together we can progress’ परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. शेअर्समध्ये फायदा होण्याऐवजी कधी कधी तोटाही होऊ शकतो. हा तोटा कमी करता येईल का?