ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

उत्पादने

views

05:59
सर्वप्रथम आपण दुग्धजन्य पदार्थांविषयी माहीती घेऊया. (अ) दुग्धजन्य पदार्थ: दुधापासून विविध पदार्थ तयार केले जातात. दूध टिकविण्यासाठी त्याचे विविध पदार्थात रूपांतर करणे गरजेचे असते. जसे चीज, लोणी, क्रीम, केफिर (शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ), योगर्ट (विरजण वापरून केलेले दही) इत्यादी. हे पदार्थ बनवताना दुधातील पाण्याचे प्रमाण, आम्लता यांमध्ये बदल होतो. आणि पोत, स्वाद, सुगंध यांमध्ये वाढ होते. बहुतेक दुग्धजन्य उत्पादनांसाठी दुधात असलेल्या जीवाणूंचाच वापर केला जातो. मात्र चीज उत्पादनात तंतुकवके वापरली जातात. योगर्ट, लोणी, क्रीम यांच्या मूलभूत क्रिया सारख्याच आहेत. यामध्ये प्रथम दुधाचे पाश्चरीकरण करून इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जातात.